Todays havaman andaj nashik नाशिक जिल्हा हवामान अंदाज
*दिपक जाधव
🌎👉🏻 *आज 7 जानेवारी
🌎👉🏻 *एसएमएस मधे सविस्तर दिलेले आहेतच पणं 9 आणि 10 जानेवारी ला हलका पाऊस दाखवते काळजी घ्या*
🌎👉🏻 *अनादी काळापासून मकर संक्रांत जवळ आली की अवकाळी पाऊस येतो पण सध्या अवकाळी पाऊस आत्ता कधीही येतो याचे मोठे कारण आहे ग्लोबल वॉर्मिग. पुढील 11 जानेवारी या तारखे नंतर पाऊस राहणार नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यात मकर संक्रांत कोरडी राहील कारण 12 जानेवारी पासून 21 जानेवारी ते जवळपास 25 जानेवारी पर्यंत पाऊस नाही पण पुढील 4 दिवस वैऱ्याचे आहेत द्राक्ष शेती ला . आणि इतर पिकांना मात्र संजीवनी आहे . मला खूप कॉल येतात त्यात 50 टक्के कॉल द्राक्ष पिका ची काळजी पोटी असतात तर 50 टक्के कॉल यंदा पाऊस कमी झाला म्हणून निदान मागचे कांदे, हरभरा , गहू पिकाणा एक पाणी भेटेल आशी अशा आहे परंतु तो निसर्ग आहे पंचतत्व वर हुकूमत माणसाची नाही आपण फक्त त्यावर संतुलन ठेऊ शकतो प्रदुर्षन कमिं करून आत्ता पुढील अंदाज*
🌎👉🏻 *काल 6 तारखेला रात्री उशिरा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलकी टीप टीप झाली जसे आपण बोललो होतो परंतु काही ठिकाणी एक ते 2 मिनिटे करता थोडा जोरात स्पेलं झाला पावसाचा आणि मात्र लगेच शांत झाला रात्री वारा शांत असतो हवा बाष्प*
*condense होते आणि अगदी कमी काळा करता 1 ते 2 मिनिटे करता जोरात स्पेल येतो बाकी खूप मोठा असा पाऊस काल 6 तारखेला झालेला नाही जिल्ह्यात फक्त 5 ठिकाण चे update आहे जिथे 5 mm झाला बाकी ठिकाणी 1 mm ची पण नोंद नाही दव पडेल या पेक्षा डबल विरळ असे ढग होते त्यामुळे तो ठिकठिकाणी पडला रात्री पण कमी intensity असली तर मात्र दव च पडते*
🌎👉🏻 *आज देखील 7 जानेवारी ला 11 वाजे नंतर कडक उन्ह राहील सकाळी दव धुके राहील मात्र दुपार नंतर उन भेटेल सायंकाळी 5 नंतर ते रात्री 2 वाजे पर्यंत ढग राहतील पूर्व भागात पावसाची शक्यता खूप कमी झाला तर हलका टीप टीप जिल्ह्यात जागोजागी होईल 8 जानेवारी ल ही कमी शक्यता*
🌎👉🏻 *मात्र 9 आणि 10 जानेवारी ला जरा धोकादायक दिसते GEM आणि ECMWF या मॉडेल चां डेटा असा दिसतो आहे की 9 तारखेला जिल्ह्यात 2 ते 5 mm पावसाची शक्यता आहे जिथे स्थानिक वातावरण निर्माण होईल तिथे पण डेटा नुसार नाशिक जिल्ह्यात निम्म्मा जिल्हा म्हंजे पूर्व भाग जोर दिसतो आणि पश्चिम भाग फक्त पिंपळगाव जवळ जरा स्पॉट दिसतो बाकी ठिकाणी हलकी टीप टीप दिसते तेव्हा 9 आणि 10 तारखेला काळजी घ्या पिकांची कसा निर्णय घ्यायचा ते तुम्ही ठरवा पेपर काढणे किंवा इतर कामे*
🌎👉🏻 *मजबूत अशी पावसाची सिस्टीम आपल्या कडे नाही केरळ कडे समुद्रात कमी दाब आहे तो खूप दूर परंतु तो अरबी समुद्रात गोलाकार फिरत असल्याने 1200 ते 1700 किलोमिटर पर्यंत हा दाब पट्ट ठिकठिकाणी प्रभावित करत आहे पावसाचे बाष्प दूर पर्यंत पसरवत आहेत रात्री देखील स्पॉट तयार होत आहे. पावसाचे जोड क्षेत्र आहे त्यामुळे दोन्ही बाजूला केरळ कडे कमी दाब पट्टा आणि हिमालय भागात तुफान बर्फबारी यामुळे आपण मध्य ठिकाणी आहेत त्यामुळे दोन्ही सिस्टीम आपल्या कडे मजबूत नाही त्यामुळे आजही मॉडेल फक्त टुप टूप पाऊस होईल म्हंजे 0.1 इतका दाखवते आहे परंतु कधी कधी intensity वाढली जाते हे लक्ष्यात घ्या मी शेतकरी हित पाहतो त्यामुळे माझे एसएमएस हे 15 दिवस किंवा महिना पासून जरी असले तरी सावध पूर्वक असतात नको पिकांचे बाजार भाव नुकसान नको व्हायला तरी पण जे आहे ते सांगण्या चा प्रयत्न असतो असोत निसर्ग आहेत तो.. माझा प्रयत्न अभ्यास करून मॉडेल आधारित मांडण्याचा प्रयत्न असतो काही लोक 1,2 ,3 जानेवारी ला देखील पाऊस दाखवत होते नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र पण तसे काही झाले नाही उगाच पाऊस होणार नसताना का सांगायचे आणि मार्केट वर परिणाम करून घ्यायचा असोत*
🌎👉🏻 *वरील अंदाज देण्याचे सोर्स*👇🏻
🌎👉🏻 *Predection source*
*हवामान अंदाज या मॉडेल मधून सांगितले आहे*
🌎👉🏻 *ECMWF* *वेदर मॉडेल*
*युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फॉरकॉस्ट*
🌎👉🏻. *GEM*
*Global Environmental Multiscale Model*अमेरिका*
🌎👉🏻 *GFS - 22 model ग्लोबल फॉरकॉस्ट सिस्टीम*
🌎 👉🏻 *BOM ब्युरो of मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदर*®
🌎👉🏻 *CANSpis*
🌎👉🏻 *NEMS -30*
🌎👉🏻 *JTWC*
🌎👉🏻 *IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खाते*
*IIMT पुणे*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें