Harbhara lagvad mahiti ,हरभरा लागवड रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे पीक महत्त्वाची कडधान्य पीक आहे.
राज्यात साधारण पाण्याची परिस्थिती असल्यामुळे हरभरा पिकाच्या लागवडीत वाढ झाली आहे.
देशाच्या एकूण हरभरा उत्पादनात मध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 11% आहे.
हरभऱ्यासाठी जमिनीची माहिती
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगले निचऱ्याची जमिनी निवडावी.
मुरमाड क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.
Harbhara $ lagvad , doller seeds.
जमिनीची मशागत
खरिपाचे पीक निघाल्यानंतर फुल नांगरवट करावी.
मागील पिकाचा काडीकचरा विचून जमीन स्वच्छ करून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या द्याव्यात.
मागील पीकास शेणखत दिले नसल्यास एकरी दोन ते तीन टन कुजलेले शेनखत जमिनीमध्ये मिसळावे व सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
पाण्याची कमतरता असल्यास नवीन पद्धतीमध्ये डॉलर ($ seeds harbhara lagvad )या जातीच्या बियाण्याची लागवड ही टोमॅटो आटोपल्या नंतर पेपर वर देखील करू शकता.
हरभरा पेरणीची वेळ.
हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने थंड व कोरडी हवा त्याला चांगली मानवते .कोरडवाहू क्षेत्रामध्ये जिथे सिंचनाची सोय अजिबात नसते तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणा नंतर म्हणजे 25 सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी .
प्रामुख्याने विजय , दिग्विजय, हे वान वापरावे. बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते १० नोव्हेबर या दरम्यान पेरल्यास चांगली उत्पादन येते. पेरण्याची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते .
काबुली ,$ doller हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.
हरभऱ्याची सुधारित वाण.
चाफा चे जुने वाण रोगाला बळी पडतात म्हणून जुन्या आथवा स्थानिक वान न वापरता सुधारित वाण वापरावी .
देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय हेवान मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायत, बागायत तसेच उशिरा प्रेरणे योग्य आहेत आणि काबुली हरभऱ्यांमध्ये विराट ,विहार ,पीकेव्ही ,दोन काकू पीकेव्ही फोर ,आणि कृपा हे वान अधिक उत्पादन देणारे आहे .यापैकी विजय आणि दिग्विजय हे देशी वाण कोरडवाहू साठी अतिशय चांगले आहे पाण्याची उपलब्धता असेल तर खत मात्र व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात .विशाल टपोरे दाण्याचा चांगले वानआहे. विराट हा काबुलीवान अधिक उत्पादनशील व मर रोगास प्रतिकारक्षम आहे.
सामान्यता देशी हरभऱ्याची पेरणी पांम्बरीने किंवा टिपणीने करावी दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर व दोन रूपातील अंतर 10 सेंटीमीटर टोकन होईल असे ट्रॅक्टर वर चालणारे पेरणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केले आहे. त्याचा वापर करणे अधिक चांगले या प्रकारे पेरणी केल्यास विजय हरभऱ्याचे हेक्टरी 65 ते 70 किलो तर विशाल विजय विराट किंवा बीकेपी टू या वाणांचे हेक्टरी 100 किलो बियाणे लागतील पीकेव्ही चार आणि कृपा वाना करिता 125 ते 130 किलो हेक्टर बियाणे वापरावे .हरभरा सरीवरही चांगला येतो भारी जमिनीत 90 सेंटीमीटर रुंदीच्या साऱ्या सोडाव्यात आणि भरुंब्याच्या दोन्ही बाजूला दहा सेंटिमीटर अंतरावर एक एक बियाणे टाकावे. काबुलीवानासाठी जमीन ओली करून वापसावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.
बीज प्रक्रिया कशी करावी
पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो दोन ग्रॅम थायरम दोन ग्रॅम बावीस तीन किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी यानंतर 250 ग्रॅम प्रतिदिन दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे असे बियाणे तासभर सावलीत चुकावे आणि मग पेरणी करावे यामुळे पिकाची रोप व्यवस्थित संरक्षण होते मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकांची वाढ चांगली होते.
खताच्या मात्रा
हरभराला हेक्टरी 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश खाताची आवश्यकता असते .हेक्टरी 125 किलो डीएपी आणि 50 किलो मुरेट ऑफ पोटॅश पेरण्याच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने पेरणी वेळ स द्यावीत खत वीसकटुन टाकू नये पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटी भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरिया ची फवारणी करावी.
अंतरशागत कशी करावी
पिकाच्या जोरदारवाडीसाठी शेत सुरुवातीपासूनच तनमुक्त ठेवावे.
पिके वीस दिवसांची झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी व महिन्याच्या असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापस्यावरच करावी कोळपणे मुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते .कोळपले नंतर एक खुरोपणी करावी .कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणी मुळे जमिनीवर असलेल्या भेगा बुजवून जातात आणि ओल टिकून राहते .तन नियंत्रणासाठी तणनाशक फवारायचे असल्यास पेरणी करताना वापशावर बसालीन अथवा पेंडा मिथेलिन हे 2.5 लिटर प्रति हेक्टर प्रमाणे 500 लिटर पाण्यातून फवारावे फवारणी करताना जमिनीत पुरेशी ओलावा असणे गरजेचे असते.
पाणी व्यवस्थापन
हरभरा पीक पाण्यासाठी संवेदनशील असे पीक आहे. हरभरा पिकाला साधारणपणे 25 सेंटीमीटर पाणी लागते. पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी द्यावे त्यामुळे ऊगवन चांगली होते मध्यम जमिनीमध्ये 25 ते 30 दिवसांनी पहिले पाणी द्यावी.
45 ते 50 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. भारी जमिनीमध्ये 35 दिवसांनी पहिले व 70 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे जमिनीच्या प्रतवारीनुसार आवश्यकतेनुसार पाणी द्यावे जमिनीत भेगि पडण्यास सुरुवात होण्याआधी पाणी द्यावे मोठ्या भेगा पडल्यानंतर पाणी अति लागले. पाण्यामुळे हरभरा वळून जातो पिकाच पाणी साचून राहिल्यास मुळकुजव्या रोगाचे पिकाची नुकसान होते. तीन पानी दिल्यास उत्पन्नात दुप्पट वाढ होते.
हरभरा पिकाची संरक्षण
हरभरा पिकाची घाठ अळीने 30 ते 40 टक्के नुकसान होते पीक तीन आठवड्याचे झाले असते त्यावर बारीक क अळी दिसू लागतात पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडा खाल्लेले दिसतात यावेळी निंबोळी अर्क 5% द्रावणाची एक फवारणी द्यावी याकरिता पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी करावी पाच किलो लिंबोळी पावडर रात्रभर दहा लिटर पाण्यात भिजत ठेवावी सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क काढून घ्यावा व नव्वद लिटर पाणी टाकावे असे द्रावण वीस गुंठे क्षेत्रावर फवारावे. पुढे दहा ते पंधरा दिवसांनी हेलीआओकील ्प्ती्प््प्ती््प्ती्प््प्त्प्त्प्ती्प््प्ती््प्ती्प््प्त्प् फास्ट 25% प्रवाहित 1000 मिली किंवा इमामेक्टिन पर्यंत पाच टक्के दानेदार अडीचशे ते पाचशे लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे या पिढीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 200 ग्रॅम ज्वारी शेतामध्ये पेरावी या पिकाच्या मित्र किडींच्या आकर्षणासाठी उपयोग होतो त्यामुळे घाटे वेळेचे नियंत्रण होते पक्षांना बसायला जागोजागी दूर काट्याची लावावी त्यावर कोळसा चिमण्या साळुंखे असे पक्षी येतात आणि अळ्या वेसतात हेक्टरी पाच फेरमांची संपलेला आहे त्यामुळे किडीचे नेमके प्रमाण आणि फवारणी देणे योग्य ठरते.
काढणी
१२० ते ११० दिवसांमध्ये आपल्याला काढणी करून उत्पादन 25 ते 30 क्विंटल हेक्टरीमिळते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें