Translate

Tomato farming important tips

 Tomato important tips for great farming.

टोमॅटो पिकातील काही महत्वपूर्ण टिप्स

१. झिमझिम पाऊसात बॅक्ट्रियल करपा ह्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी बॅक्टो (सायन्ट) ३० ग्रम सोबत फवारणी फार महत्वाची आहे. त्यासोबत कोणतेही एक काँटॅक्ट बुरशीनाशक चालेल. कारण बॅक्टो हे टॉमटो पिकांत लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा यांवर नियंत्रण मिळवते. तसेच हे स्पर्शजण्य व आंतरप्रवाही क्रिया करणारे जैविक जिवाणूनाशक आहे. तसेच झांथोमोनास , सुडोमोनास यांसारख्या जिवाणूवर प्रभावी निंयत्रण मिळवते.


२. पीथीयम बुरशीमुळे गळ पडत असल्यास जैविक डॉक्टर ग्रोथ ग्रोथ ची आळवणी द्यावी. 

३. बॅकटिरियाल मर दिसत असल्यास डॉक्टर ग्रोथ एकरी ५०० ग्रम द्यावे.

४. बांधणीच्या आधीपर्यंत कमीतकमी १० ते १२ किलो कॅल्शियम दिले पाहिजे त्यासाठी ड्रिपकल सोडावे व कलविझ फवारणी घ्यावी म्हणजे कॅल्शियमचा पुरवठा सुरळीत होईल.

५. प्लॉट बांधणी च्या वेळे पर्यंत पाऊस असल्यास झाडाची ज्यास्त वाढ होते तेंव्हा टिल्ट एकरी ३० मिली देऊ शकता.

६. बांधणी च्या वेळेस मोलिबडीनम एकरी १०० ग्रम + फेबिओन १ लि. + राजफर्ट डीएफ २.५ लि झाडाची वाढ व्यवस्थित होऊन चांगली फुल व फळ धारणा होते.

७. फॉस्फोरस जमिनीत खूप लवकर फिक्स होते त्यामुळे त्याला टप्याटप्याने थोडा थोडा द्यावे किंवा अल्कामिंन ६० १ ली द्यावे यात ६०% फॉस्फरस आहे त्यामुळे फॉस्फरस पुरवठा होतो.

८. तिरंग्याचा प्रभाव कमी करण्यासाठी फुलधारणे पासून Fe (फेरस) ची फवारणी व ड्रीप द्वारे द्यावे. (एकरी१००ग्रम)

९. मँग्नीशियमचा वापर कृषीड्रीप , फेबिओन किंवा विद्राव्य खतांसोबत वेळोवेळी करावा. त्यामुळे बुडातील पाने पिवळे होण्याचा (हळद्या) प्रमाण कमी होते त्यासोबत रूट मजिक हे फायदेशीर ठरते कारण त्यातून हुमिक, फुलविक व पॉटशची पूर्तता होते.


१०.कॅलवीज + बोरान तिरंगा टाळण्यासाठी लागवडीच्या सुरुवाती पासून Ca, Mg, Fe किंवा कॅलवीज + बोरान दर १० ते १२ फवारणी करावी किंवा दर १० दिवसात फेबायोंन + मँग्नीशियम दिल्यास पुढील तिरंग्याचा संकट टाळू शकतो किंवा प्रमाण कमी करू शकतो.

११.डॉफ -थ्रीप्स, रस शोषक किडी नियंत्रण* डॉफ ची फवारणी थ्रीप्स व इतर रस शोषक किडी नियंत्रणासाठी ७ दिवसाच्या अंतराने २ ते ३ वेळेस करावी म्हणजे टोमॅटोवरील व्हायरसचे सामान्य वाहक आणि संभाव्य उत्पन्न मिळण्यातले अडथळे म्हणजे पांढरी माशी आणि फुलकिडे (थ्रिप्स) कमी होईल आणि वेळीच पायबंद घातल्यास हे व्हायरसला बळी पडणार नाही म्हणूनच सुरवातीपासूनच वाहक कीटकांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे ठरेल.

१२.अळी व नागअळी :-अळी व नागअळी साठी स्लोगन १० मिली २० ली पाण्यात घेऊन फवारणी घ्यावी. स्लोगन नारडस व सिविड बेस असल्यामुळे सर्व प्रकारच्या अळ्यांना खाण्यास प्रतिबंध करून झाडाला जैविक व अजैविक ताणांपासून वाचवते. तसेच हे सर्व प्रकारच्या अळ्यांची भूक मंदावून अळ्यांचे जीवन चक्र थांबविण्यास मदत करते.

१३. प्लॉट बांधणी झाल्या नंतर लगेच चिकट सापळे व कामगंध सापळे लावा म्हणजे कीड नियंत्रण करणे रोपे होते.

१४. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये किंवा सल्फर चा वापर जास्त करावा.

१५. फुलधारणा कमी वाटत आल्यास स्कॉच६० २५० मिली + १४:००:४५ ५०० ग्रॅम + बोरान १०० ग्रॅम ची फवारणी घ्यावी व जमिनीतून राजफर्ट डीएफ २.५ लि + १३:४०:१३ ५ किलो च्या वापरामुळे गर्भधारणा व्यवस्थित होऊन उत्पन्न वाढीमध्ये मदत होते.

Tomato farming important tips 

१६. फुलगळ ज्यास्त होत असल्यास ड्रीप मधून १२:६१:०० + कृषीड्रीप सोडावे समाधानकारक रिजल्ट्स मिळत आहेत.

tomato spraying 

१७. फुगवणीच्या कालावधीमध्ये एस.ओ.पी.५ किलो + स्टारसल्फ २ ली ड्रीप वाटे द्या.

१८.फुगवणी दरम्यान फळाला तडे जाणे किंवा देठापासुण फळ गळून जाणे त्यासाठी ड्रिपकॅल (कल्शियम ४०.५%) जमिनीतील कॅल्शियमची कमतरता त्वरित भरून काढते. ज्यामुळे फळाला लवचिकता मिळते व फुगवणीलाही मदत होते.


अधिक माहितीसाठी संपर्क ☎️9834287823

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.