Translate

Npk 0.52.34 liqvid, नत्र,स्फुरद,पोटॅशिअम संपूर्ण माहिती...

 NPK 0:52:34  ची संक्षिप्त माहिती

0 52 34 मध्ये 0% नत्र, 52% स्फुरद आणि 34% पोटॅशिअम असते. याच्यात असलेल्या फॉस्फरस म्हणजेच स्फुरद मुळे मूळ्यांच्या विकासाला मदत होते आणि फुलांच्या संख्येत वाढ आणि पिकाचे खोडे टणक बनते.


यांच्यातील पोटॅश मुळांची योग्य वाढ करून पिकांना उपटण्यापासून वाचवते. पोटॅशच्या वापरामुळे वनस्पतींच्या पेशींच्या भिंती जाड होतात.

वनस्पतींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पोटॅश आवश्यक आहे.

ज्यावेळी पिकाची फुलधारणा चालू होते त्यावेळी या खताचा वापर करणे गरजेचे असते.

या खताचा ड्रीपमधून उपयोग आपण टमाटर, अद्रक, ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा, कापूस, हळद, टरबूज इत्यादी पिकांवर करू शकतो.

फवारणीसाठी याचा उपयोग आपण जवळजवळ सर्व पिकांवर करू शकतो.

ड्रीप मधून सोडतांना हि काळजी घ्या कि जमीन ओली असणे गरजेचे आहे आणि कोणत्याही तणनाशक, बुरशीनाशक आणि कीटकनाशकासोबत या खताचा वापर करू नये.

फवारणी साठी याचे प्रमाण आपण प्रति 20 लिटर पाण्याच्या पंपसाठी 100gm घेऊ शकतो,

आणि ड्रीपसाठी 200 लिटर पाण्यात 2 ते 4 किलो पर्यंत घेऊ शकतो किव्हा तुमच्या पिकाच्या आवश्यकते आणि अवस्थे नुसार कमी जास्त करू शकतो.


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.