Translate

Kanda Bajarbhav: ‘या’ ठिकाणी लाल कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव.... प्रति क्विंटलचा दर, वाचा काय आहे आजची कांद्याच्या बाजारभावाची स्थिती

Kanda Bajarbhav: ‘या’ ठिकाणी लाल कांद्याला मिळाला सर्वाधिक  भाव.... प्रति क्विंटलचा दर, वाचा काय आहे आजची कांद्याच्या बाजारभावाची स्थिती 


राज्यातील विविध ठिकाणाच्या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक सध्या मोठ्या प्रमाणावर होत असून काल सारखीच सगळ्यात जास्त आवक नाशिक जिल्ह्यातील सगळ्या बाजार समितीमध्ये दिसून आली. आशिया खंडातील सगळ्यात मोठे कांद्याचे बाजारपेठ असलेल्या लासलगाव मध्ये आज 20680 क्विंटल कांद्याचे आवक झाली.


लाल कांद्याचे दर हे विविध ठिकाणच्या बाजार समितीमध्ये किमान शंभर ते कमाल तीन हजार चारशे रुपये पर्यंत दिसून आलेत. तसे पाहायला गेले तर लाल कांद्याचे दर हे अजून देखील हव्या त्या प्रमाणात नसून शेतकऱ्यांची अपेक्षा भंग करणारेच दिसून येत आहेत. या लेखामध्ये आपण राज्यातील काही महत्त्वाच्या बाजार समितीमधील लाल कांद्याची आवक व आजचे बाजार भाव जाणून घेऊ.
- चांदवड बाजार समिती– या ठिकाणी आज लाल कांद्याची 12000 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 500 ते कमाल 1351रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारभावाची सरासरी 1050 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.

2- लासलगाव बाजार समिती– या ठिकाणी आज 36002 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 500 ते कमाल 1580 रुपये प्रति क्विंटल इतका बाजार भाव मिळाला. बाजारभावाची सरासरी ही 1201 रुपये प्रतिक्विंटल इतके राहीली.

3- येवला– बाजार समिती– या ठिकाणी आज 20000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 300 ते कमाल 1414रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला व बाजारभावाचे सरासरी 970 रुपये प्रतिक्विंटल इतकी राहिली.

 मालेगाव–मुंगसे बाजार समिती– या ठिकाणी आज 19000 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली व झालेल्या लिलावात किमान 310 ते कमाल 1300 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. बाजारभावाची सरासरी ही 1100 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.

5- नागपूर बाजार समिती– या बाजार समितीत 1000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 1000 ते कमाल 1500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला व बाजारभावाचे सरासरी 1350 रुपये प्रति क्विंटल इतके राहिली.

6- मनमाड बाजार समिती– मनमाड बाजार समितीत आज लाल कांद्याची 12000 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 500 ते कमाल 1266 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला व बाजारभावाची सरासरी 1100 रुपये प्रतिक्विंटल इतके राहिले.

7-पिंपळगाव बसवंत  बाजार – या ठिकाणी आज 21750 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली व झालेल्या लिलावात300 किमान 1490ते कमाल 1150 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारभावाची सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.

8- देवळा बाजार समिती– या ठिकाणी आज 7750 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 250 ते कमाल 1275रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारभावाची सरासरी 1050 रुपये प्रति क्विंटल इतके राहिले.

9- धुळे बाजार समिती– या ठिकाणी आज 1720 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली व झालेल्या लिलावात किमान 150 ते कमाल 1225 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सरासरी ही 1000 रुपये प्रति क्विंटल इतके राहिले.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.