Translate

घेवडा लागवड सविस्तर माहिती,Ghevda lagvad beens farming .

 Ghevda lagvad beens farming ,घेवडा लागवड

 घेवडा लागवडीसाठी हालकी ते मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन अतिशय योग्य असते.





10 ते 15 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.18:46:०० 100kg +सींगल सुपर फॉस्फेट एकरी 200 ते 250kg बेड वर पसरून द्यावे.

 खरीप हंगामात लागवड  जून जुलैमध्ये करावी व उन्हाळी हंगामात जानेवारी व फेब्रुवारी मध्ये करावी.

Ghevda lagvad लागवडीचे अंतर 

 वेलवर्गीय घेवड्यासाठी साधारणता सरी मधील अंतर हे चार फूट असावे. वेलवर्गी घेवडा साठी तार व काठीचा आधार देणे गरजेचे असते. Ashoka seeds,novel #Nfl _35 beens (Avani) seeds, या काही वेलवर्गीय ghevdyache बियाणे आहे.

कमी वाढणाऱ्या भुईलगत असणाऱ्या घेवड्यासाठी हे अंतर साधारणता दोनच फूट करावे.

Seminis falguni beans, Sakura pencil beens,bioseeds rani,MALGUDI BEANS , ghevada selection 9,


Seminis falguni beans seed ,


या भुईलगत वाढनारे ghevda beens ahet.


 5 ते 7 kg बीयाने  एकरी पुरेसे असते.

रायझोबियम दहा ते पंधरा किलो बियाण्यास 250 ग्रॅम या प्रमाणात बियाणा चोळावे.

Ghevda beens घेवडा पिकाचा कालावधी 90 ते 110 दिवसांचा असतो. वेलवर्गीय घेवडा हा  जास्त दिवस चालतो.

खोडमाशीच्या नियंत्रणासाठी पिकाची उगवण झाल्यानंतर सायपरमेथ्रीन 25% प्रवाही पाच मिली दहा लिटर पाण्यातून फवारावे.   


घेवडा  बुर्शी रोगiसाठी खुप संवेदनशील आहे त्यामुळे मर ही जास्त होती.

त्यावर बावीसटीन लिक्विड द्वारे सोडावे. 


Cabrio top हे आंतरप्रवाही बुरशीनाशक स्प्रे बुरशी येऊ नये म्हणून preventive अगोदरच घ्यावा.

मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव हा पावसाळी वातावरणात दिसतो त्यामुळे सल्फर liqvid द्वारे driching किंवा dripne जमीनीत सोडावे .

वेलवर्गीय जातींच्या 15 ते 20 दिवसाच्या अंतराने तारकाठींचा आधार घेऊन बांधणी करावी.

पानांवरती नागअळी दिसल्यास अबासीन किंवा  अबामॅकटिन यांचा सात ते आठ एम एल प्रति पंप या प्रमाणात स्प्रे घ्यावा.

  लाल कोळी , नागअळी, सफेद माशी यांचा देखील नियंत्रणा अबासिन  च्या स्प्रे मुळे मिळू शकते.

फुलकळीची सुरुवात होताच 00 52 34 किंवा 00 60 20 लिक्विड खतांची मात्रा एकरी पाच किलो  ड्रिप मधून द्यावी.

फळ  व पाने खाणारी अळी  दिसताच ऍम्प्लिगो 100ml किंवा कोराजनचा 60ml acre स्प्रे घ्यावा.

60ते 65 व्यां दिवशी ghevda तोडणी योग्य होतो.. 

हिरव्या शेंगांची उत्पादन साधारणता 40 ते 50 क्विंटल एकरी मीळु  शकते.






कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.