✴️टोमॅटो पिकात होणाऱ्या फुलगळ होण्यामागची कारणे.
✅तापमान:टोमॅटो पिकात जर 29℃पेक्षा जास्त तापमान असेल तर फुलगळ होते,तसेच 15℃पेक्षा कमी तापमान असेल तरी फुलगळ होते. टोमॅटो पिकात फुलवस्था चांगली राहण्यासाठी 21℃ये27℃हे पोषक तापमान आहे.
✅आर्द्रता: जर आर्द्रता ही 40%पेक्षा कमी असेल तर टोमॅटो पिकात फुलगळ होते व आर्द्रता 70%पेक्षा जास्त असेल तरी टोमॅटो पिकात फुलगळ होते. टोमॅटो पिकासाठी फुलवस्था साठी आर्द्रता 40% ते 70 %पोषक आहे.
✅नैसर्गिक ताण:टोमॅटो पिकात जर जास्त पाऊस, जास्त वारे यांसारख्या गोष्टींमुळे सुध्दा फुल गळ होते.
✅नायट्रोजन चा वापर:टोमॅटो पिकात जर नायट्रोजन वापर जास्त झाला तर दोन फांद्यांतील अंतर जास्त होते व फुलांची संख्या कमी व फुलगळ होते, तसेच नायट्रोजनचा वापर कमी केल्याने सुद्धा टोमॅटो पिकात फुलगळ होते.
✅रोग व कीड:टोमॅटो पिकात येणाऱ्या रोग व किडी यांमुळे येणाऱ्या ताणामुळे फुलगळ होते.
✅जलसिंचन:टोमॅटो पिकास पाण्याचा जास्त ताण दिल्यामुळे फुलगळ होते, तसेच पाण्याचा अतिवापर यामुळे सुद्धा टोमॅटो पिकात फुलगळ होते.टोमॅटो पिकात वाफसा स्थितीवर प्लॉट ठेवणे हे फुलनिर्मिती व फुलगळ थांबवण्यासाठी गरजेचे आहे.
👍वरील नैसर्गिक बदल झाले की फुलगळ सुरू होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें