Translate

फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर.... 🌧️ Rainy season spraying schedule

 फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का ?

 पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने इतर हंगामांपेक्षा जास्त असतो. त्यात झडीचा व संततधार पाऊस रोगांचे नियंत्रण ठेवणे अवघड बनवतो. बऱ्याच वेळा फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुनर्फवारणी विषयी संभ्रम निर्माण होतो.


 ही खालील घटकांवर अवलंबून असते

फवारणीनंतर किती वेळाने पाऊस आला ?

फवारणीनंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो. 

रसायन जर आंतरप्रवाही असतील तर ३-४ तासात शोषली जातात, व जर स्पर्शीय असतील तर कीटक व किडींवर ५०-६०% परिणाम केलेला असतो. अशावेळी पुनर्फवारणीची करू नये.

कोणत्या रसायनाची फवारणी केली

ऍसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी १२-१४ तास लागतात त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ऍसिफेट ची फवारणी टाळावी. डायमेथोऍट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर टाळावा.

पावसाची तीव्रता व वेग

फवारणीनंतर लगेचच २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर ५०-६० % फवारा धुवून जातो. अशावेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते.


फवारणीनंतर एक तासाने १५-२० मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते.


थेंबाचा आकार मध्यम किंवा मोठा असेल व फवारणीनंतर १५-२० मिनिटे पाऊस चालला तर ९५% फवारा धुवून जातो. अशावेळी हवामानाचा अंदाज बघून २-३ तासानंतर फवारणी करावी. पावसाळ्यात फवारणी शक्यतो सकाळी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी



हवामानाचा अंदाज बघून पाऊस येण्याआधी फवारणी टाळावी.


फळबागांवर पावसाळ्यात ३ दिवसांतून एकदा बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक असते.

किटकनाशकापेक्षा बुरशीनाशकांचा अधिक वापर करावा.


पावसानंतर लगेच फवारणी टाळावी.कारण तुम्ही फवारलेले रसायन झाडावर पाणी असल्याने जमिनीवर पडते. परिणामी वाया जाते व जमिनीत झिरपल्याने मित्रजिवाणू मारले जातात. त्याचबरोबर विहिरीत मिसळण्याचा धोकाही असतोच.


पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकर, इमल्शन (चिकट द्रावण) चा उपयोग करावा, जेणेकरून रिमझिम पावसाचा फवाऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.