Cabbage 🥬 planting,कोबीची लागवड व औषधाची थोडक्यात माहिती.
कोबीची लागवड शक्यतो महाराष्ट्र मध्ये बाराही महिने चालते.. कोबी seeds f1doller, veer, namdhari 183, cabbage F1 Bharat, golden green, अशा भरपूर सुधारित जाती बाजारात उपलब्ध आहे आपल्या क्षेत्रानुसार बाजारपेठेनुसार योग्यता पानाची लागवड करावी शक्यतो लागवड मे जून जुलै व रब्बी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये करतात.
बियाण्याचे प्रमाण साधारणता 300gm ते 350gm acre लागतात. साधारणता एका एकर साठी नाशिक विभागात वीस ते 25 हजार रोपांची लागवड सध्या तरी केली जात आहे.
वर दिलेल्या फोटोमध्ये इनलाइन ड्रीप टाकून दोन ओळी कोबीच्या रोपांच्या लावल्या आहेत. ही पद्धत सध्या जास्त प्रमाणात नाशिक विभागात अवलंबली जात आहे. जेणेकरून कोबी विकास लिक्विड खते व पाणी मुळात भोवती जलद उपलब्ध होऊन पीक लवकर काढणीस येते.
रेन पाइपाचा देखील वापर करून आपण कोबी पीक चांगले प्रकारे घेऊ शकतो.
पाण्याचा योग्य वापर होऊन गवताचे देखील नियंत्रण मिळवता येते.
लागवडीच्या अगोदर एकरी दहा टन शेणखत जमिनीत पसरून द्यावे.
80:40:40 kg नत्र :स्फुरद :पालाश लागवड अगोदर जमिनीत पसरून द्यावे.
पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करावी.
गरजेनुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी देणे.
पिकाचा कालावधी हा बियाणे नुसार 60 ते 80 दिवसाचा आहे.
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी कॉन्फिडन्स सुपर, ओबेरान, आबामेक्टिन या कीटकनाशकाचा योग्य प्रमाणात वापर करावा.
कोबीच्या पिकांमध्ये जर आळई दिसत असेल तर कोराजन, डेलीगेट,ampligo यासारखे औषधांचा वापर करावा.
पाकोळी व पतंग यांच्या नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी मुख्य एका भोवती व कडेने मोहरी करावी 25 ओळींच्या लागवडीनंतर दोन ओळी मोहरीच्या पेराव्यात.
शेतात पक्षी बसण्यासाठी काठीचे मचान लावावे.
एकरी पाच फेरोमन सापळे लावावे. ही सौरचलित पाकोळी नियंत्रणासाठी वापरली यंत्र आहे
मोहरीवर आळी दिसू लागल्या कोरजन किंवा डेलिगेट यांचा फवारा घ्यावा.
सुरुवातीच्या काळात निंबोळी अर्क चार टक्के ची फवारणी घ्यावी.
करपा दिसू लागल्यास मॅन्कोझेब किंवा कॉपर अक्सिक्लोराईड किंवा क्लोरोफ्लोनील 25 ग्रॅम + स्टिकर 10 मिली 10लिटर पाण्यातून फवारावे.
ब्लॅक राॅड या रोगाचे लक्षण दिसू लागल्यास कॉपर ऑक्झिकलोराईड 30ग्रॅम + स्ट्रिप्टोमाइसिंन 1gm10 लिटर पाण्यात मिसळून दर दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
सुरुवातीच्या काळात लागवड झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने 12 61 एकरी पाच किलो दर पाच दिवसांनी द्यावे.
लागवडीनंतर साधारणतः 35 ते 40 दिवसांनी 00:52:34 एकरी पाच किलो दर पाच दिवसांनी 3 वेळेस द्यावे.
50 ते 60 दिवसांची कोबी झाल्यानंतर 00:00: 50 5kg दोन वेळेस 5 दिवसाच्या अंतराने विभागून द्यावी.
साधारणता एकरी 15 ते 20 टन उत्पादन मिळते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें