*🍅टोमॅटो नियोजन वेळापत्रक🍅*
*टोमॅटो रोप निवडतांना*
वातावरण आणि विभागा नुसार योग्य व्हरायटीची लागवडीसाठी निवड करावी.
साधारण 25 दिवसांचे आणि 4 ते 4.5 इंच वाढलेले रोप लागवडीसाठी योग्य असते.20 दिवसापेक्षा कमी कालावधी चे रोप असल्यास ते लागवडी नंतर मर रोगाला लवकर बळी पडते.
रोप निवडतांना त्यावर बॅक्टेरिअल रोगाचे, व्हायरसचे किंवा नाग अळईचे इन्फेक्शन व्यवस्थित चेक करून घेणे.
*शेणखत टाकायचे असल्यास-*
शेण खताचा 3फूट उंचीचा ढीग करून घ्यावा, लागवडी अगोदर 2 ते 3 महिने त्यावर वेस्ट कंपोजर चे द्रावण तयार करून ते ढिगावर टाकून घ्यावे. ढिगावर दर 3 ते 4 दिवसांनी पाणी मारून घेणे, जेणेकरून ओलावा टिकून राहील.
*बेड तयार करणे*:- 4.5 ते 5 फुटाचा 1 ते 1.5 फूट उंचीचा बेड तयार करून घेणे
*वेस्ट डीकंपोजर द्रावण तयार करण्याची कृती -*
200 लिटर पाणी प्लास्टिक च्या ड्रम मध्ये घेणे, त्यात *2 किलो* गूळ पूर्ण विरघळून घेणे,त्यात 1 बाटली वेस्ट डीकंपोजर हाताचा स्पर्श न करता टाकणे. हे द्रावण 5 दिवस रापावणे ( दिवसातून 3 वेळा हलवणे,शक्य झाल्यास पंपाद्वारे हवेचा पुरवठा करणे)
हे सर्व द्रावण एकरी 200 लिटर प्रमाणे वापरणे. या द्रावणातून 20 लिटर द्रावणाचा विरजण म्हणून परत 200 लिटर वेस्ट डी कंपोजर द्रावण बनवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
*टोमॅटो बेसल डोस-*
14: 35 :14 – 2 बॅग *किंवा*
यारा मिला कॉम्पलेक्स- 2 बॅग
+
रीजेंट GR- 5 किलो
+
SOP – 20 किलो
+
बेनसल्फ- 10 ते 20 किलो (जमीन चुनखडी असेल तर 25 किलो)
+
निंबोळी पेंड – 500 किलो
*टोमॅटो रोपाची लागवड करते वेळी –*
▪ लागवड करण्या अगोदर टोमॅटो रोपाची मुळे ट्रायकोडर्मा-500 ग्रॅम + ऍक्टरा-50 ग्रॅम (प्रती 100 लिटर) च्या द्रावणात 10 मिनिटे बुडउन घ्यावी.
▪ लागवड शक्यतो दक्षिण- उत्तर करावी.
▪ रोपाची लागवड हि अत्यंत महत्वाची स्टेज आहे लागवड चुकल्यास, टोमॅटो चालू झाल्यानंतर देखील रोपे कोलमडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होऊ शकते.
▪ दोन बोटे व्यवस्थित होलच्या मधोमध बेड मध्ये दाबून खड्डा तयार करून घ्यावा व रोपाचे खोड सरळ जमिनीमध्ये जाईल अशा पद्धतीने लागवड करावी.
▪ दोन रोपांमधील अंतर हे दीड फुटापेक्षा कमी नसावे. दीड ते दोन फुटाचे अंतर लागवडीस योग्य आहे.
▪ बाजारात मिळणाऱ्या पिवळ्या चिकट सापळ्याचा एकरी 50 ते 100 या प्रमाणात वापर करावा जेणेकरून शेजारील पिकातून येणारी पांढरी माशी प्रथम या पिवळ्या चिकट सापळ्याकडे आकर्षित होते व त्यावर चिकटून मरते.
लागवडी नंतर पहिल्या 5 दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारच्या खतांची ड्रेंचीग न करता फक्त पाण्याची चुळ एका रोपास 150 ते 200मिली या प्रमाणात 2किंवा 3 वेळा द्यावी.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें