मी बांध बोलतोय
कितीही असली जमीन तरी
बांधातच अडकतो तुझा जीव...
बांध कोरणाऱ्या माणसाची
मला येते खूप कीव.
माझ्या अंगात नेहमी असायची
हिरवीगार गवताची साडी...
आरामात बांधावरून जायची
दोन्ही बांधकऱ्याची गाडी.
जमिनीचे झाले तुकडीकरण
किंमत पण वाढली...
मला मारण्यासाठी मग
बाहेर टिकाव फावडी काढली.
हळू हळू कोरून मला
केले बांधावरून गायब
भांडणे झाली बांधकऱ्यात
मोजणी करायला आला सायब.
मनगटशाहीच्या जोरावर
मला कोरण्याची माणसांची हिंमत...
माझ्या असण्याची त्यांना
समजली नाही किंमत.
जोरात आला पाऊस
जमीन गेली वाहून...
एकमेकांना मारायला मग
अंगावर गेली धावून.
एकमेकांना मारून त्यांच्या
तोंडाला आला फेस...
एकमेकांची जिरविण्यासाठी मग
पोलीस स्टेशन मध्ये दाखल केस.
कोर्ट कचेऱ्याची आता
सुरू झाली वारी ...
बांध कोरणारी भिकारी झाली
वकिलांचे खिसे जड झाले भारी.
बांध कोरणारे भिकारीच राहतात
होत नसतात कधीच श्रीमंत...
कोर्ट ,कचेरी , मारामारी,खून
यांच्यातच होत असतो अंत.
आहे याच्यातच समाधानी रहावं
वागू नये खोटं...
बांध कोरून कधी कोणाचे
भरते काय पोटं ?
बांधापायी संसार उध्वस्त
जीवनाचा होतो घात...
नका बांध कोरू विनंती करतो
जोडुनी दोन्ही हात मी बांध बोलतोय
कितीही असली जमीन तरी
बांधातच अडकतो तुझा जीव...
बांध कोरणाऱ्या माणसाची
मला येते खूप कीव.
माझ्या अंगात नेहमी असायची
हिरवीगार गवताची साडी...
आरामात बांधावरून जायची
दोन्ही बांधकऱ्याची गाडी.
जमिनीचे झाले तुकडीकरण
किंमत पण वाढली...
मला मारण्यासाठी मग
बाहेर टिकाव फावडी काढली.
हळू हळू कोरून मला
केले बांधावरून गायब
भांडणे झाली बांधकऱ्यात
मोजणी करायला आला सायब.
मनगटशाहीच्या जोरावर
मला कोरण्याची माणसांची हिंमत...
माझ्या असण्याची त्यांना
समजली नाही किंमत.
जोरात आला पाऊस
जमीन गेली वाहून...
एकमेकांना मारायला मग
अंगावर गेली धावून.
एकमेकांना मारून त्यांच्या
तोंडाला आला फेस...
एकमेकांची जिरविण्यासाठी मग
पोलीस स्टेशन मध्ये दाखल केस.
कोर्ट कचेऱ्याची आता
सुरू झाली वारी ...
बांध कोरणारी भिकारी झाली
वकिलांचे खिसे जड झाले भारी.
बांध कोरणारे भिकारीच राहतात
होत नसतात कधीच श्रीमंत...
कोर्ट ,कचेरी , मारामारी,खून
यांच्यातच होत असतो अंत.
आहे याच्यातच समाधानी रहावं
वागू नये खोटं...
बांध कोरून कधी कोणाचे
भरते काय पोटं ?
बांधापायी संसार उध्वस्त
जीवनाचा होतो घात...
नका बांध कोरू विनंती करतो
जोडुनी दोन्ही हात 🙏🙏
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें