Translate

खरबूज लागवड माहिती,muskmelon planting, खरबूज लागवड ,लिक्वीड खतांची व स्प्रे ची थोडी माहिती.

खरबूज लागवड माहिती,muskmelon planting, खरबूज लागवड ,लिक्वीड खतांची व स्प्रे ची थोडी माहिती. 

जमिन
मध्यम काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

खते 
६ ते ८ टन शेनखत प्रती एकर जमीन मातीत मिसळून द्यावे.

हायब्रीड seeds
 Kundan muskmelon, Nunhems Madhulika,advanta madhu149, muskmelon f1 us111, पुसा सरबती, पंजाब सुनहरी , दुर्गपुरा मधुु.


लागवडीचा हंगाम
खरीप हंगाम जून-जुलैमध्ये उन्हाळी हंगाम जानेवारी फेब्रुवारी मध्ये असतो.
पण महाराष्ट्र मध्ये सध्या सर्वच हंगामात खरबुजाची लागवड केली जात आहे.
खरबुजाच्या लागवडीसाठी शक्‍यतो 20 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस तापमान हे योग्य असते.

बियाण्याचे प्रमाण
700ते 800 ग्रॅम प्रति एकरी बियाणे पुरेसे होते.
बीज लागवड करणारा असेल तर कॅप्टन 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे व नंतर लागवड करावी.
पण शक्यतो आता महाराष्ट्रामध्ये नर्सरीमध्ये रोपे तयार करूनच लागवड केली जात आहे.
रासायनिक खते
लागवडीपूर्वी नत्र, स्फुरद ,पालाश  _50 :50 :50 किलो प्रति एकरी लागवडीअगोदर मातीत मिसळून द्यावे व नंतर बेड तयार करून मल्चिंग पेपर टाकून लागवडीस तयार करावी.
पिकाचा कालावधी साधारण 80 ते 100 दिवसाचा आहे. नर्सरी मध्ये रोपे तयार असतील तर हा कालावधी सत्तर दिवसांचाच होतो.
रोपांच्या वाढीच्या अवस्थेत लिक्विड खत 1919 19 5kg लागवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी.
शाकीय विस्तार 12 :61:00 5kg लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी.
फुले धरण्याच्या अवस्थेत 13 40 13 10kg acr.
तीस ते पस्तीस दिवसांच्या कालावधीत मल्टी केन कॅल्शियम नायट्रेट 5kg.
पिके 35 दिवसाची झाल्यानंतर zn+fe+mn+cu+b micronutrients दोन किलोचा एक ठोस द्यावा.
फळधारणा सुरुवात झाल्यास 13:00:45  5kg acre दर पाच दिवसांच्या अंतराने चार वेळा द्यावेत.
पुनर्लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांच्या अंतरावर 00:60:20 10kg acr 
पुनर्लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांच्या अंतराने 00:00:50 10kg+sulfer 3kg ड्रिप ने दोन वेळेस द्यावे.
फळ काढणीस तयार झाली असल्यास पाणी देणे बंद करावे जेणेकरून शुगर लेवल वाढेल. फळे खाण्यास गोड लागतील.


पिकांवरील मुख्य रोग
केवडा डाऊनी मिल्ड्यू या रोगाच्या नियंत्रणासाठी एम झेड 72 25 ग्रॅम किंवा फोसेटील 20 ग्रॅम  +मॅन्कोझेब 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून 6 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
Melydi deo 600gm acr किंवा कर्झेट 600gm acr यांचा देखील उपयोग केवडा डाऊनी मिल्ड्यू साठी करू शकता.
काळा करपा
मॅन्कोझेब , कॅप्टन किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.
या फवारणी पानावर पडलेले टिपके देखील
 नाहीसे होतात.
भुरी
कार्बेन्डाझिम , ट्रायाडेमार्फ किंवा डीनोकॅप 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून सहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
लुना, सल्फर , कॉन्टॅफ etc.

कीटक नियंत्रण
फुलकिडे मावा पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी कार्बोसलफान 10ml 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
फुलकिडे मावा पांढरी माशी पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाणी वाकडी होतात व तसेच कीटक विषाणूजन्य रोगाचा प्रसार देखील करतात.
कीटकांच्या नियंत्रणासाठी  confidor super,emidacloropide,oberon,asetafet, tatamanik, Soloman etc.


नाग आळी
नाग आळी पानांच्या आतील शिरा खात जाते व पानांवर नागमोडी सुकलेल्या रेषा दिसतात.
 नियंत्रणासाठी निंबोळी अर्क किंवा ट्रायअझेफोस 20मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
Oberon, abacin, corogen etc. यांचा रिझल्ट नाग आळी वर अतिउत्तम आहे.
फळमाशी
खरबुजावरील फळमाशी हा अत्यंत महत्त्वाचा रोग व नियंत्रण साठी अवघड जाणारा रोग आहे यामध्ये सुरुवातीच्या काळात फळांमध्ये राहून आतील गर खाते व फळे सडतात आणि अकाली पिवळे होऊन गळतात.
या रोगाच्या नियंत्रणासाठी फळमाशी सापळे एकरी 20सापळे लावावेत व मॅलॅथिऑन 20 मिली+ 100 ग्राम गुळ10 लिटर पाण्यात मिसळून फळाचा आकार

टोमॅटो इतका होईपर्यंत दोन ते तीन स्प्रे फवारावे.
साधारण उत्पादन हे पंधरा ते वीस टन एकरी निघू शकते.


Tecfarming is not responsible that... just education purpose only .
Thanks for reading 🙂 farmer.



कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.