Translate

मिरची लागवड माहिती आणि व्यवस्थापन,mirchi lagvad mahiti & spraying, liquid schedule

मिरची लागवड माहिती आणि व्यवस्थापन,mirchi lagvad mahiti & spraying, liquid schedule

पावसाळी मिरची लागवड, मिरची लागवड कशी करावी, उन्हाळी मिरची लागवड, लाल मिरची लागवड, सोनल मिरची लागवड, मिरची mirchi फवारणी वेळापत्रक आणि लिक्विड खतांची माहिती व सर्व  रोगाची माहिती.
Mirchi lagvad mahiti

मिरची मध्ये नवीन सुधारित वाण लागवडीच्या पद्धती नवीन आलेले तंत्रज्ञान यामुळे उत्पादकता वाढत आहे.
मिरची मध्ये क आणि अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे.
फॉस्फरस आणि चूना यांचे प्रमाण चांगले आहे. ढोबळी मिरची पेक्षा इतर मिरची मध्ये तिखटपणा जास्त असतो.
मिरची मध्ये तिखट पणा हे कॅप्सिसीन द्रव्यामुळे तर लाल रंग कॅप्सिनस्थिन रंग कनामुळे येतो. मिरचीचा उपयोग बाराही महिने भाजीसाठी, मसाल्यामध्ये ,लोणचे इत्यादींमध्ये चवीनुसार केला जातो.


Mirchi lagvad सुधारित जाती 
मिरची पिकामध्ये खूपच नवीन सुधारित जाती विकसित झाले आहेत. 
Mirchi seeds 
Vnr145,sitara,myhico 456,vnr Nupur,Vnr978,vnr sunidhi,vnr38f1,vnr277, Indus seeds jalsa 3,URJA US-327 - मिर्च F-1 संकर बीज ,अग्निरेखा, फुले सई, फुले मुक्ता, फुले ज्योती, फुले सूर्यमुखी ,बळीराम ,अग्नि , तेजा 4-लवंगी या सर्व जाती उत्पादनास व गुणवत्तेस चांगल्या जाती आहेत.

जमिन आणि हवामान

मध्यम ते काळी आणि पाण्याचा चांगला उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात खत घातल्यास चांगले पीक येऊ शकते.
 उष्ण आणि दमट हवामान मिरची पिकास वाढ जोमदार होते.
 उत्पादन चांगले मिळते परंतु हिवाळी हंगामात 20 ते 30 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास मिरची पिकाची वाढ कमी होते आणि उत्पादनात घट होते . फुलधारणा व फळधारणा कमी प्रमाणात होती.

Liquid information
लिक्विड खतांची
Mirchi lagvad लागवड कधी करावी

खरीप हंगामासाठी बियांची लागवड नर्सरीमध्ये मे महिन्याच्या अगोदर पूर्ण करून घ्यावी व लागवड ही शक्यतो जुन महिन्यात अखेर पर्यंत करावी.

 Mirchi रोपवाटिका

मिरचीचे लागवडीचे यश ह चांगल्या जोमदार रोपांवर अवलंबून असते .रोपे तयार करण्यासाठी 100 चा ट्रे वापरावा.सर्व ट्रे मोकळी करून त्यामध्ये 25 टक्के भरेल इतकं कोकोपीट टाकून घ्यावे व नंतर एक एक बी टाकून संपूर्ण ट्रे कोकोपीट ने भरावा. रोपांची उगवण झाल्यानंतर  ट्रे च्या जवळपास 25 ते 30 ग्रॅम थिमेट किंवा फोरेट  टाकून घ्यावे. रोपे उगवून आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी टाकावे. रोपे तीन ते चार आठवड्यांचे असताना 15 लिटर पाण्यासाठी m-45 25 ग्रॅम व क्विनॉलफॉस 15 एम एल मिसळून फवारणी करावी. त्यामुळे तुडतुडे, कोळी, फुलकिडे यांचे नियंत्रण होऊन बोकड्या (पर्णगुच्छ )या रोगांपासून संरक्षण करता येते.

Mirchi रोपांची लागवड
लागवडीअगोदर 20 टन कुजलेले शेणखत प्रति एकरी टाकून द्यावी. Npk 50 :25: 25 kg जमिनीत मिसळून द्यावी. निंबोळी पेंड 200 किलो प्रमाण एकरी टाकावे.
साधारण सरी-वरंबा पद्धतीवर मिरचीची लागवड करतात. लागवड करण्याअगोदर व्यवस्थित बेड  मधील अंतर चार फूट असावे. ड्रिप टाकून मल्चिंग फिट करून घ्यावे. मिरची लागवड zig_ zag पद्धतीने करावी. लागवडीअगोदर संपूर्ण बेड दोन दिवस ड्रीप ने ओले करून घ्यावी व वापसा कंडिशन मध्ये लागवड करावी. 

लागवड करतेवेळी रोपांची मुळे इमिडाक्‍लोप्रीड 10 मिली किंवा कार्बोसल्फान 30 मिली + ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम + 10 लिटर पाणी या मध्ये लागवडी अगोदर मुळे बुडन घ्यावी व नंतर लागवड करावी.

Mirchi अंतर मशागत

सुरुवातीपासून पीक तणमुक्त ठेवावे. दोन शहरांमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

पाणी व्यवस्थापन


मिरची पिकाला गरजेनुसार पाणी देणे जरुरी असते म्हणून ड्रीप ने पाणी देताना पाणी जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते .जमिनीचे प्रकार ,पाऊस मान आणि तापमान विचारात घेऊन पाण्याच्या पाळ्या ठरवत जमिनीच्या मगदुरानुसार व हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास पुले आणी फळ गळण्याचा धोका असतो म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये तसेच गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

मिरची पिकास स्प्रे आणि लिक्विड

मिरची पिकावर प्रामुख्याने फुलकिडे, कोळी, फळे पोखरणारी अळी, या किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो फुल कडेही पानांच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानांतून रस शोषून घेतात त्यामुळे पानांच्या कडा वरील बाजूस वाळतात पाने लहान होतात व व्हायरस व चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे प्रमाण कोडे हवामानात जास्त आढळते म्हणजेच जून ची सुरुवात किंवा मे चा शेवट. या किडीमुळे पिकाची 10 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. 

लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांनी मीथील डिमेटॉन 10 ते 15 मिली 10 लिटर पाण्यासाठी पहिली फवारणी घ्यावी .
2री सायपरमेथ्रीन 4 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा इमिडाक्लोरोपीड 4 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तीन ते चार दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. निंबोळी अर्काचा देखील फवारण्या कराव्यात. फवारणीसाठी कोणत्याही एकच कीटकनाशक न वापरता अदलून बदलून कीटकनाशकाचा वापर करावा.
मिरचीची महत्त्वाचे रोग म्हणजे फळकूज ,फांद्या वाळणे भुरी येणे आणि पान छोटी होणे.
दमट हवामानामध्ये या रोगाचे जंतू जास्त प्रमाणात वाढतात फळांवर चट्टे पडतात व फळे कुजतात व फांद्या वाळून झाड शेंड्यापासून पूर्ण रोगग्रस्त होऊन वाळून नष्ट होते.
कोलेटोट्रीकम या बुरशीमुळे हा रोग पसरतो. या रोगाची लक्षणे दिसतात शेंडे खुडून त्यांचा नाश करावा व डायथेन एम-45 किंवा  ब्लायटॉक्स यापैकी एक 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच 5 दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या घ्याव्यात.
भुरी या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसते या रोगाच्या नियंत्रणासाठी गंध(sulfer) 30 ग्रॅम किंवा बाविस्टिन(bavistin)10 ग्रॅम किंवा केरातीन 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या पाच ते सात दिवसांच्या अंतराने कराव्यात.
 प्रमुख रोग  चुरडा मुरडा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार मावा, कोळी, फुलकिडे , कीटक यांच्यामार्फत होतो या किडी  पानांतील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे पानांच्या शिरा आंतील सुरकुत्या पडून  वाढ खुंटते झाड रोगट होते .रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस 10 मिली +sulfer 30gm + m45  25gm+15 लिटर पाण्यासाठी 3ते4फवारण्या या 8 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. फुल किडींच्या नियंत्रणासाठी असिफेट 10 ग्रॅम आणि लाल कोळीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
आळी ही कळीच्या देठाजवळ भाग खाते त्यामुळे कळी गळून पडते. अळीच्या नियंत्रणासाठी ampligo 80-100ml एकरी spray द्यावा.

Liquid information
लिक्विड खतांची

सुरुवातीच्या काळात पाऊस कमी असेल व वातावरण मोकळी असेल तर 19:19:19 एकरी पाच किलो ड्रिप मधून द्यावी.
मॅग्नेशियम सल्फेट  सात किलो acre 30 दिवसांनी द्यावे.
12 :61:00. मिरची पिकाची योग्य वाढ होईपर्यंत देत राहावे. तीन ते चार किलो एकर या प्रमाणात चौथ्या दिवशी लिक्विड सोडावे.
00:60:20 फुलांची लागवड व कळी सेटिंग सुरू झाल्यानंतर तीन किलो एकर या प्रमाणात चौथ्या पाचव्या दिवशी लिक्विड देत राहावे.
फुलगळ किंवा फळगळ दिसत असल्यास बोराॅन 250 ग्रॅम एकर ड्रिप ने द्यावे.
www.

Tecfarming.com

मिरचीचा शेंडा कमी दिसत असल्यास 13:00:45 4kgखुडा झाल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी देत राहावे.



कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.