Translate

Onion prices,कांदा बाजार समित्यांमधील आजचे बाजारभाव, today's onion prices localmarket,#onion price

 Onion prices localmarket, today's onion prices high,कांदा बाजार भाव.


पिंपळगाव बसवंत येथील बाजार समिती मध्ये आज कांद्याला 4500 असा उच्चांकी बाजारभाव मिळाला.तर सरासरी दर 3901 मिळाला. आवाज19000 किंटल होती.

नाशिक जिल्ह्यातील  अतिपावसाने लाल कांद्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अति उष्ण वातावरण असल्याने साठवणूक केलेला उन्हाळ कांदा देखील खूप मोठ्या प्रमाणात चाळीमध्ये खराब झाला.

तसेच देशामध्ये कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात तेजी दिसत आहे.

राजस्थान मधील लवकर तयार होणारा लाल कांदा जिलेबी रोगामुळे उध्वस्त झाला आहे. त्यामुळे देशावर मार्केटमध्ये लाल कांदा लवकर उपलब्ध होऊ शकत नाही. नासिक , धुळे, जळगाव तेथे देखील अतिपावसाने लाल कांद्याचे खुप मोठे नुकसान झालेले आहे ,त्यामुळे नवीन लाल कांदा मार्केटमध्ये येणे लवकर शक्य होणार नाही. त्याचाच प्रभाव म्हणून  कांद्याच्या भावात वाढ दिसत आहे. तसेच महाराष्ट्रातील काही इतर प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे आहेत.12/10/2021#कांदा बाजार भाव#onionprice



अति पाऊस असल्याने कांदा पिकावरील मर रोग ,करपा ,मूळकूज , असे रोग दिसून येत आहे. तसेच कांद्याची रोपे देखील अतिपावसाने खराब झाल्याने लगवड क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. लागवड चित्र देखील दर वर्षाच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे भविष्यात येणार लाल कांदा देखील चांगलाच बाजार भाव मिळवेल असे दिसत आहे.

नवीन लाल कांदा सधारण डिसेंबर मध्ये बाजारात उपलब्ध होईल तोपर्यंत उन्हाळ कांद्याला असेच चढे बाजार मिळत राहण्याची शक्यता आहे. बाजार चढे भाव मिळत असली तरी उत्पादन मात्र घटणार आहे अति पावसाने केलेले नुकसान चढ्या भावाने देखील पूर्ण  भरून शकत नाही.



कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.