Translate

कांदा(Onion) लागवड कधी आणि कशी करावी, Red onion how to planting .

 कांदा लागवड माहिती आणि व्यवस्थापन onion farming

 कांदा(Onion) लागवड कधी आणि कशी करावी, Red onion how to planting .



शेतकरी मिञांनो लाल कांदा लागवड कधी करावी लागते. (कांदा लागवड माहिती )

onion planting Marathi mahiti.
 कांदा लागवड ही शक्यतो ऑगस्ट महिन्यात व सप्टेंबर महिन्यात करतात.
लाल कांदा लागवड करायची म्हटली की कांदा बियाणे ही महत्त्वाची भूमिका असते.
लाल कांदा बीयाने ही शक्यतो लाल  रंगाच्या कांद्याची बीयाने असावी.
शेतकऱ्यांकडील घरगुती कांद्याचे बियाणी खात्रीशीर असावेत किंवा बाजारातील योग्य कंपनीचे खात्रीशीर बियाणे निवडावे. 

Onion seeds(कांदा बी):
एल्लोरा, रेड चायना, हळवा कांदा, पंचगंगा(panchganga) साधारण 2500ते3500rs kg आहे. घरगुती कांदा बियाणे वापरतात असाल तर साधारण 10000rs पायली बियाणे भाव मागील काही दिवसांपासून सुरू आहे.


कांदा लागवडीत रोपवाटीका तयार करणे ही महत्त्वाची भूमिका असते.

जुलै महिन्यात रोपवाटीका तयार करून  रोपं तयार करून घ्यावी. 50दिवसाची रोपे लागवडीसाठी तयार असतात.
रोप तयार  असतात तेव्हा पाणी जास्ती साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

कांदा (onion)लागवड करायची म्हटली तर वाफे तयार करावेत.

पावसाळ्यात वाफे तयार करताना पाणी खुप साचणार नाही याची काळजी घ्यावी.
सुपरफाॅस रोपवाटिका तयार करताना टाकावेत.

लाल कांदा लागवड ही शक्यतो ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात.singal supar फॉस्फेट ५ bag acre,
लाल कांदा 

बेसल डोस
 लागवडीच्यावेळी 15:15:15 सुफला किंवा 10:26:26 
100kg
 सिंगल सुपर फॉस्फेट 100kg
युरिया  25 kg
 निंबोळी पेंड 50 kg
मुळांची भरपूर वाढ आणि पिकांचे संपूर्ण पोषणासाठी जमिनीत टाकून द्यावी.

वाफे तयार करूनच कांद्याची लागवड करा.
कांदा लागवड झाल्यानंतर त्यांना तननाशकाची फवारणी करून कांदा तणमुक्त ठेवावे. 
लागवड केल्यानंतर ओलावा असताना goal १५ml+targa supar १५ml १५, लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.१५ लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅम चिलेटेड झिंक घेतल्यास कांद्याची पात पिवळी होत नाही. असे काही अनुभवी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सर्व गवत जाळून नष्ट होते व कांदा पीक तणमुक्त होते.
सुरवातीच्या काळातील अनेक कीड नियंत्रण आणण्यासाठी
1= lithel supar ३००ml+saf ५००gm spray २००liter पाणी. 
2=Politrin c 500 ml+antracol 500gm 200 लिटर पाण्यासाठी दुसरा स्प्रे.
3=Solomon 250ml+ srp सिलिकॉन250gm +00:52:34 1kg 200 लिटर पाण्यासाठी.
4=कांदा पिकातील भागातील मोहो,मावा, फुलकिडे, पांढरी माशी, आटोक्‍यात येत नसेल तर
politrin c 600ml+देशी दारू 720ml 200 लिटर आणि याचा स्प्रे करून कांदा पिकास दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचे.
खतांच्या मात्रा=उष्णता कमी  झाल्यानंतर थंडीच्या सुरु होण्याअगोदर कांदा पिकास रासायनिक खतांचा वापर करून पाण्यास सुरुवात करावी


कांद्याची शाकीय वाढ अवस्था
लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी युरिया 50किलो आणि 15‌:15:15 100किलो एकरी  द्यावा. 
कांद्याच्या गाभ्यात जर मोहो दिसत असेल आणि कांद्यावर करपा असेल तर सोलमन दोनशे लिटर साठी 200 एम एल व त्यात 24:10 :10+ 1kg +z78 500gm यांचा एकत्रित फवारणी घ्यावी.
Lesenta 40gm+sap 500gm चार एक फवारणी करावी.
कांद्याची पात टिकवण्या साठी Merion ८०ml acre spray घ्यावं. 

फुगवण आणि पक्वतेच अवस्था 
लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी अमोनियम सल्फेट 50 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो एकरी पाटपाणी पद्धतीने द्यावी.
24 :24: 00 महाधन एकरी दोन बॅग पाण्या अगोदर द्याव्यात.
 
.
किटकनाशकांची योग्य ते फवारणी करून कांद्याची पात ही हिरावी राहील यावर लक्ष असावे.

कांदा पिकासाठी तन नाशक भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
योग्य त्या ओलावा असताना तणनाशकाचा वापर करून शेत तणमुक्त ठेवावे.
वाफसा कंडिशन मध्येच  कांदा पीकास पाणी द्यावे.

कांदा  फुगवणी साठी काढणी अगोदर 15 दिवस 00.00.50 1kg+k up potash 500ml 200liter पाणी स्प्रे घ्यावा. 
00:00:50  किंवा एमऒपी एकरी 50 ते 60 किलो शेवटच्या पाणी अगोदर टाकून द्यावे .
 पति खराब होऊ लागली की कांदा  कडणीस करावा. कांदा काढणीनंतर साधारण दोन दिवस पडू द्यावा. व नंतर पात 50% सुकली कि कापणी करावी. म्हणजे कांद्याला मोड येणार नाही.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.