काकडी लागवड आणि व्यवस्थापन,Kakdi lagwad /cucumber planting
काकडी लागवड शक्यतो दोन हंगामात केली जाऊ शकते पहिला हंगाम जून-जुलै आणि उन्हाळी हंगाम जानेवारी फेब्रुवारी .
पण आता काकडीची लागवड ही बारा महिने करत आहे.नाशिक विभागात काकडी ही मल्चिंग पेपर वर घेतल्याने काकडीचे उत्पादन विक्रमी असे निघत आहे. काकडीची लागवड करताना बियाणे योग्य निवडावे.
cucumber plantingकाकडीचे बियाणे
काकडीचे बियाणे पाहता भरपूर बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
त्यामध्ये हंगामानुसार काकडीची लागवड व बियाण्याची निवड करावी.
त्यामध्ये us800शिवालीक(Shivalik), tata11,tata05,जिप्सी(zipsi), स्वाती (swati), zipsy ,हीरवी काकडीचे बीज,,महाभाारत etc.
काकडीची बीयाणे कींमत साधारण ४०० ते८०० ₹ पुडी प्रमाणे मीळते.
आपण आपल्या क्षेत्रानुसार बियाण्याची निवड करावी.
काकडीची लागवड करताना बेड मधील अंतर साधारण 4 ते 5 ft अंतर ठेवावे. दीड ते दोन फूट रोपांमध्ये अंतर ठेवठेवावे. लागवड शक्यतो मल्चिंग पेपर व ईनलाईन ट्रीप टाकूनच करावी.
लागवडीअगोदर एकरी दहा टन शेणखत 50/ 25/25 किलो/ नत्र/ स्फुरद/ पालाश प्रति एकर लागवडी अगोदर मातीत मिसळून द्यावे. साधारण चार ते पाच फूट सरी मध्ये अंतर असेल असे बेड पाडून घ्या. लागवडीअगोदर पूर्ण बेड ओले करून झाल्यावर वापसा कंडिशन मध्ये लागवड करून घ्यावी .
लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी ..
वेलीची जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी अश्या दोन-तीन नायलन बारीक दोरी करून घ्यावे.किंवा आता मार्केटमध्ये बारीक नायलॉन जाळी उपलब्ध आहे ती वापरावे.
काकडीची उगवण झाल्यानंतर आठ दिवसांनी ह्युमिक ऍसिड 12% 500 ग्राम एकरी द्यावे.
काकडीची लागवड झाल्यानंतर लिक्विड 12. 61.00 वेलीची योग्य वाढ होईपर्यंत देत रहावे.
फळांची सेटिंग सुरू झाल्यावर व फळे लागल्यानंतर 00/52/34
00.60.20 व आलटून-पालटून मायक्रोनुट्न द्यावे.
काकडी ची वाढ जास्त होत असेल तर sop 500gm+boron 250gm + tilt 20 ml 200 liter पाणी या प्रमाणे स्प्रे घ्यावा.
आंतरमशागत 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नियमित पिकातील तण काढून घ्यावे व खुरपणी द्यावी .
खुरपणी करावी.
लागवडीनंतर एक महिन्यांनी वरखतांच्या मात्रा चालू कराव्यात
खतांचा अतिरिक्त वापर झाल्यास फळ लागवड कमी होते व शेंड्यावर जास्त बळ जाते.
औषधी..
सुरवातीच्या काळात 4मिली इमिडा क्लोरोपिड
दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे किंवा
Confidor super 0.5ml per 1liter
Water या प्रमाणात फवारावे.
काकडी वरील लाल कोळी व नाग आळी साठी ओबेरॉन , अबामेक्टीन यांचा स्प्रे योग्य प्रमाणात घ्यावा.
Abamectin0.5ml liter या प्रमाणात फवारणी घ्यावी.
फळमाशी डाग पडणारे किडे यासाठी मॅलेथिऑन 20ml 100 ग्रॅम गुळ व 10 लिटर पाणी यांची फवारणी 20 मिली प्रमाणे करावी
भुरी व केवडा रोग
Mancozeb m45 किंवा z 72,0.25% किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.25%
0.1% चिकट द्रव यांची दहा दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर एक महिन्याने फवारणी करावी.
भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी 0.5% ट्रायडेमार्फ फवारणी घ्यावी.
तसेच भुरि या रोगासाठी कॉन्टॅक्ट औषधांमध्ये कॉन्टॅफ , Luna ,sulfer योग्य प्रमाणात वापर करून स्परे घ्यावा.
आळीसाठी शक्यतो कोराजन एकरी 50ml फुलकळी सेट झाल्यानंतर स्प्रे घ्यावा. शेतामध्ये साधारण 1 acre साठी100 yellow card थ्रिप्स साठी चिटकून घ्यावी.
पावसाळी वातावरणात काकडीस धुवून घ्यावेत, जास्त जाड,वाकडी बाजुला भरावी.
Tata 11, tata1505, Shivalik , zipsy+ , zipsy seeds या veriety काकडी ला मार्केट मध्ये सर्वोच्च भाव मिळत आहे. काकडीची गुणवत्ता वा टिकाऊपणा जास्त असल्याने मागणी देखील खूप आहे.
टीप: हवामानानुसार व विभागानुसार आपण आपल्या पीकात बदल करावा ,
Tecfarming is not responsible for that .....
Just education perpose only..🙏🙏🥒
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें