Translate

MIRCHI, TOMATO, BHENDI, KAPASHI, KID NIYANTRAN IN FARM MARATHI

पिकांवरील कीड नियंत्रणासाठी उपाययोजना 


१ .ऊस [ सुरु ]SUGARKEN 
सुरु उसाची लागवड होऊन १० ते १६ आठवडे झाले असल्यास नत्र  खताची मात्र २५ किलो [ ५४ किलो उरीय्या ]या प्रमाणात द्यावा . ८ ते १० दिवसाच्या अंतराने गरजेप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्या. 
उसाच्या सरीमध्ये हेक्टरी ५ टॅन पाचटाचे आचछादन टाकावे . 
त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो ,सेंद्रिय खताचा पुरवठा होतो आणि ओल देखील जास्त काळ टिकून राहते . 


२ मिरची MIRCH

मिरचीवर फुलकिडे आणि कोळी यांचा प्रादुर्भाव होत असेल तर या किडींच्या नियंत्रणासाठी मिथिल डायमेथोएट ३० ई . सी   १६  मि. ली .  ,मिथिल  डिमेटोन २५  इ .सी . १५ मिली, आधिक गंधक ८० % २० GR प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे .


भुईमूंग . BHUIMUNG
भुईमुंगावरील पाने गुंडाळणाऱ्या अळी  च्या बंदोबस्तासाठी प्रतिहेक्टरी फॉस्फमिडॉन  ८५ % १२० मिली किंवा २०% प्रवाही सायपरमेथ्रीन २०० मिली  किंवा  २५% प्रवाही क्विनॉलफॉस १००० मिली हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . 

भेंडी. BHENDI

पानाच्या शिरा पिवळ्या पडणे किंवा हळदू [ येलोव्हेन मोझॅक व्हयरस  ]या रोगाचा प्रसार पांढरी माशी करते या कीटकांचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येतो ,विशेषतः समशीतोष्ण आणि कोरड्या हवामानात किडिंचे प्रमाण जास्त असते . 
उपाय . 
 १ नवीन संकरित जातींची निवड करावी ,२ लागवडीनंतर फोरेट हे दाणेदार कीटकनाशक हेक्टरी १० किलो या प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे . 
३ .रोपांची उगवण झाल्यापासून दार ६ते ७ दिवसांच्या  अंतराने फॉस्फोमिडॉन  +डायक्लोरोफॉस  प्रत्येकी ३. मिली प्रति १० लिटर पाणी  यांची फवारणी करावी . फळे लागल्यानंतर १० मिली मॅलेथीऑन प्रति १० लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी  किंवा ५% निबोळी अर्काची फवारणी करावी ,तसेच बगिसाईड   हे जैविक कीडनाशक २० ग्राम  १० लिटर पाण्यातून ८ दिवसाच्या अंतराने फवारावे . 


 टोमॅटो . . TOMATO 

ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर फुलकिडे व पंढरीमाशी  या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत असल्यास डायमेथोएट १० मिली १ ० लिटर पाणि किंवा  मिथिल डिमेटोन १० मिली १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे  .  फळ पोखरणारी अली व पाने पोखरणारी अली या किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास  कोरोजन  हे ६० मिली एकरी या प्रमाने  फवारावे . 

कपाशी .  KAPASHI
 कपाशीची लागवड लवकर करावी .  लागवडी साठी नवीन आलेले संकरित  बियाणे  वापरावे . 
माध्यम जमिनीत ९० बी ९०  सेमी अंतरावर लागवड करावी , भारी जमिनीत १२० बी ९० वर लागवड करावी . लागवडी पूर्वी २० किलो  नत्र   ,५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या प्रमाणात खताची मात्र द्यावी 


  


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.