Translate

bhendi lagvad ani vyavasthapan,okra planting agriculture

भेंडी 

okra planting agriculture,#bhendi lagvad, 

योग्य व्यवस्थापनातून मिळतो भेंडीला bhendi भाव

योग्य व्यवस्थापनातून मिळतो भेंडीला bhendi भाव
भेंडी अत्यंत सारक पाचक असल्यामुळे या पिकाचे आ हारातील महत्त्व विशेष आहे.

राज्यातील हवामान भेंडी पिकाला अनुकूल असून,
हीवाळ्याचे २-३ महिने साेडल्यास जवळजवळ वर्षभर हे पीक घेता येते.

 भेंडीला बाजारपेठेत वर्षभर मागणी असते. भाव आणि आर्थिक फायदा मिळवण्याच्या दृष्टिकाेनातून भेंडीची काढणी विक्री व्यवस्थापन अचूकपणे करणे जरुरीचे ठरते.


भें डी पिकाची काढणी करताना फळांचा दर्जा म्हणजेच फळांचा लुसलुशीतपणा, लांबी जाडी इत्यादी बाबी लक्षात घेणे जरुरीचे आहे.

 कारण की यावर बाजारपेठेतील भेंडीचा भाव अवलंबून असताे. फळांची लांबी, जाडी, रंग लुसलुशीतपणा ह्या बाबी जातीपरत्वे आणि शेताची मशागत या बाबींवरसुद्धा अवलंबून असतात.
लागवडीकरिता याेग्य वाणांची निवड आणि पिकाचे याेग्य व्यवस्थापन हे उत्कृष्ट दर्जाची भेंडी मीळण्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरते. 

तसेच भेंडीची # bhendi काढणी लवकरात लवकर केल्यास झाडांची वाढ झपाट्याने हाेऊन झाडांवरील फळांच्या संख्येत वाढ हाेते. त्यामुळे जास्त ताेडे मिळतात पर्यायी पीकापासून उत्पादन अधिक मीळते.
बी लावल्यापासून ४५ ते ५० दिवसांत भेंडीला फुले येऊ लागतात. फुले उमलल्यापासून ते वसांत भेंडी  #bhendiही ताेडणीला येते.
शेतात पेरणी किंवा लागवडीसाठी सरळ वाणांचा वापर केल्यास ताेडे सुरू झाल्यापासून दर ते दिवसांनी नियमित ताेडे करावे लागतात. संकरीत वाणांचा वापर केल्यास ताेडे सुरू झाल्यापासून दर ते दिवसांनी ताेडे करावे लागतील. कारण की या कालावधीत ताेडलेल्या भेंडीचा दर्जा हा बाजारपेठेच्या दृष्टिकाेनातून याेग्य राहताे.
सर्वसाधारणत: फळधारणा झाल्यानंतर किंवा िदवसांपासून भेंडीत रेषा निर्माण हाेऊन ती जुनी हाेऊ लागते. त्याआधीच भेंडीची काढणी केल्यास ती काेवळी लुसलुशीत राहते.

 गरजेनुसार भेंडीची ताेडणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, सकाळी ताेडणी केलेल्या भेंडीचा ताजेपणा, रंग तजेला जास्त काळ टीकून राहताे. ताेडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी, भेंडीच्या फळामध्ये पाण्याचे प्रमाण हे ८० ते ९० टक्के राहते.

तेव्हा भेंडी उत्पादकांनी भेडी पिकाच्या काढणीकडे लक्ष दिल्यास अधिकचे उत्पादन मिळून बाजारभाव अधिक मिळण्यास मोठी मदत होईल.

 कारण भेंडीला वर्षभर मागणी असते. सध्या तर मोठ्या शहरांमध्ये या मालाचा तुडवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने भेंडीचे उत्पादन काढण्यावर भर द्यावा.  

 कारण या भेंडीला दर मोजण्यास ग्राहक तयार आहे. ही संधीचा लाभ भेंडी उत्पादकांनी घेतला पाहिजे.
डाॅ.प्रज्ञा एस.गुडाधे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
माेबाइल( मो. ९४२०१२८६०३)
विक्री व्यवस्थापन
भेंडीचीताेडणी झाल्यानंतर फळांची हाताळणी प्रतवारी करणे आणि पॅकिंग करून बाजारपेठेत पाठवणे या बाबींचा विक्री व्यवस्थापनामध्ये समावेश करता येईल. 

भेंडीची ताेडणी झाल्यानंतर सावलीत ठेवून त्यामधील राेग किडग्रस्त फळे तसेच जुनी झालेली फळे वेगळी करावीत. प्रतवारी झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या बाजारपेठेनुसार भेंडीचे पॅकिंग करावे.
 बाजारपेठेची विभागणी ही जवळील बाजारपेठ (स्थानिक बाजारपेठ) आणि दूरची बाजारपेठ (जिल्हास्तरीय बाजारपेठ) याप्रकारे करता येईल.

 स्थानिक बाजारपेठेमध्ये भेंडी विक्रीकरिता पाठवायची असल्यास भेंडीची काढणी सकाळी लवकर करून त्वरित बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावी.


 ताेडलेली भेंडी ही ते किलाे वजनाची क्रेट किंवा टाेपलीत भरून पॅकिंग करून पाठवावी.

 दूरच्या बाजारपेठेत भेंडी विक्रीकरिता पाठवायची असल्यास भेंडीची ताेडणी दुपारनंतर आटोपून भेंडीची प्रतवारी सावलीत करावी. 

ताेडलेली भेंडी ही १५ ते २० kg किलाे वजनाची, दाबता हलके karetsकरून ठेवावे आणि ताबडताेब दुसऱ्या दिवशी बाजारपेठेत पाठवावी. 

सर्वसाधारणत: खरीप हंगामात भेंडीची चांगली साठवण केल्यास भेंडीची फळे ही २४ तासांपर्यंत विक्रीस याेग्य राहतात. 
भेंडी फळांची वेळेवर अचूकपणे काढणी करावी, तसेच काढणीपश्चात व्यवस्थित हाताळणी याेग्य पॅकिंग करूनच बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावी

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.