जनावरांच्या गाभणकाळात 3 महिन्यांचे ३ टप्पे दिसून येतात. पहिल्या टप्प्यात जनावरांच्या गर्भधारणेची खात्री होणे गरजेचे असते.
जनावरांची गर्भधारणा टिकून राहणे यासाठी विशेष काळजी महत्वाची ठरते. सदोष गर्भ वाढीच्या पहिल्याच टप्प्यात गर्भपाताद्वारे बाहेर फेकले जातात तर गर्भधारणा टिकवू न शकणारे संकरीत जनावरे गर्भपाताद्वारे शरीराचा ताण कमी करतात. यादृष्टीने जनावरांची काळजी महत्वाची ठरते.
गर्भधारणेचा दुसरा टप्पा सुरक्षित समजला जातो. या काळात जनावरांना भरपूर हिरवा चारा, व्यायाम आणि आरोग्य नियंत्रण याबाबी महत्वाच्या ठरतात. शरीर वजनात भरपूर वाढ व शरीरात उर्जेची मोठी साठवणूक करण्यासाठी हा गर्भधारणेचा दुसरा टप्पा उपयुक्त ठरतो.
गर्भधारणेचा तिसऱ्या टप्प्यात जनावरांची विशेष काळजी वेगळ्या व्यवस्थापनाद्वारे आवश्यक असते. अशी गाभण जनावरे मोठ्या प्रमाणात दूध देत असल्यास 7 व्या महिन्यानंतर आटवणे महत्वाचे ठरते.
गाभण जनावरांना बंदिस्त व्यवस्थापनात आहार पुरविणे व त्यांच्या गर्भधारणेची तपासणी नियमित पशुवैद्यकाकडून करून घेणे या काळात महत्वाचे असते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें